Ad will apear here
Next
‘पाण्याखालची रत्नागिरीही सुंदर’
जिल्हाधिकाऱ्यांनी लुटला स्कूबा डायव्हिंगचा आनंद; वाघवळी किनाऱ्यावर केली स्वच्छता


रत्नागिरी :
‘रत्नागिरी शहर तर सुंदर आहेच; पण रत्नागिरीला लाभलेल्या समुद्राचे अंतरंगही अतिशय सुंदर आहेत. या पाण्याखालचे विश्व अत्यंत अद्भुत आहे. स्कूबा डायव्हिंगच्या सुविधेमुळे या सुंदर जगाची सैर करता येते. त्यामुळेच पर्यटनवाढीसाठी हा उपक्रम खूप महत्त्वपूर्ण आहे,’ असे उद्गार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले. हर्षा स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून त्यांनी नुकताच हा अनुभव घेतला. त्यानंतर ते बोलत होते. त्यानंतर जवळच्या वाघवळी किनाऱ्याला भेट दिल्यावर तेथील अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त करतानाच त्यांनी स्वतः तेथील कचरा उचलायला सुरुवात केली आणि नागरिकांसह किनारा स्वच्छ केला. सुंदर गावे, शहरे स्वच्छ राखणे ही प्रशासनाबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी असल्याचा धडा त्यांनी घालून दिला.



सुनील चव्हाण यांनी पत्नी कांचन चव्हाण यांच्यासह ‘हर्षा’चे सुहास ठाकुरदेसाई आणि कौस्तुभ सावंत यांच्यासह हा आनंद लुटला. समुद्रातील रंगीबेरंगी मासे, प्रवाळ, विविध वनस्पती पाहिल्यामुळे हे जग किती वेगळे, समृद्ध आहे, याचा प्रत्यय आल्याचे त्यांनी सांगितले. ‘स्कूबा डायव्हिंग हे रत्नागिरीच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार तर मिळणार आहेच. परंतु रत्नागिरी ही पर्यटननगरी म्हणून विकसित होणार आहे,’ असे ते म्हणाले. त्याचा मासेमारी व्यवसायाला कोणताही धोका नसल्याने हे एकमेकांना पूरक व्यवसाय असल्याचे त्यांनी सांगितले.



‘हर्षा स्कूबा डायव्हिंगचे डायव्हर्स आंतरराष्ट्रीय प्रमाणित आहेत. पाण्याखाली ते आपली काळजी घेतात. त्यामुळे भीती निघून जात असल्याचा प्रत्यय येतो,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 



स्वच्छतेचा धडा
स्कूबा डायव्हिंगनंतर त्यांनी जवळच्या वाघवळी किनाऱ्याला भेट देऊन तेथील देवीचे पवित्र स्थान आणि गोड्या पाण्याच्या झऱ्याचीही पाहणी केली; मात्र या किनाऱ्यावर त्यांना अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या असा कचरा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतः कचरा उचलण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत पत्नी, सुहास ठाकुरदेसाई, कौस्तुभ सावंत, डायव्हर्स यांच्यासह अन्य पर्यटकांनीही किनारा स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला आणि अवघ्या तासाभरात किनारा स्वच्छ झाला. चांगल्या गोष्टी करण्यासाठी केवळ इच्छाशक्ती लागते, याचे उदाहरण जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिले. दर १५ दिवसांनी आपण हा किनारा स्वच्छ करत असल्याची माहिती ग्रामस्थांनी या वेळी दिली. 

वाघावली किनाऱ्यावर काही ठिकाणी जुगारासारखे काही अवैध प्रकार रात्रीच्या वेळी घडल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘पर्यटनस्थळे सुरक्षित आणि चांगलीच ठेवली पाहिजेत. अशा ठिकाणी गैरप्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZUFBV
Similar Posts
आता रत्नागिरीतही लुटा स्कूबा डायव्हिंगचा आनंद रत्नागिरी : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या कोकणातील रत्नागिरी हे एक निसर्गरम्य शहर. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना आता निसर्गसौंदर्यासोबतच समुद्रातील सौंदर्यही अगदी जवळून न्याहाळता येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निःशुल्क हेल्पलाइन; ध्वनिसंदेशांद्वारे माहिती रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, तसेच आपत्ती व्यव्यस्थापन विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना, शेती-पशुपालनाची तांत्रिक माहिती, सामाजिक उपक्रम, रोजगार आदींसह अन्य आवश्यक माहिती ध्वनिसंदेशामार्फत देण्याचा उपक्रम नुकताच सुरू झाला. रिलायन्स फाउंडेशन माहिती
‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’ रत्नागिरी : ‘दिव्यांग बांधव शारीरिक व्याधींवर मात करून समाजात जगत असतात. त्यामुळे आपण सर्व जण समाज म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
भाट्ये किनाऱ्यावर तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट दाखल रत्नागिरी : तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस एच १९८’ हे हॉवरक्राफ्ट देशाच्या पश्चिम किनार्‍यावर गस्त घालत असताना १० जानेवारी २०१९ रोजी रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर दाखल झाले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ११ जानेवारीला सकाळी या हॉवरक्राफ्टच्या कार्यप्रणालीची पाहणी करून सागरी सुरक्षेचा आढावा घेतला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language